दहा वर्षापूर्वी झालेला नगर अर्बन बँक कॉलनी रस्ता महानगर पालिकेने मॉडेल म्हणून स्वीकारावा – विपुल वाखूरेयांची मागणी

आयुक्त श्री डांगे यांनी भेट देऊन खात्री करून घ्यावी व हा रस्ता “मॉडेल” म्हणून स्वीकारावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी ) अर्बन बँक कॉलनी रस्ता मॉडेल म्हणून अहमदनगर महानगरपालिकेने स्वीकारून नगरमध्ये उत्कृष्ट रस्ते निर्माण करावीत अशी मागणी कार्यकर्ते विपुल वाखूरे यांनी केली आहे.माजी खासदार सुजय विखे व आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या प्रयत्नातून शहरातील रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी अहमदनगर महानगर पालिकेला मिळालेला आहे. या निधीचा वापर करताना दर्जेदार रस्ते करण्यात यावेत.                     विनायक राज प्रतिष्ठान चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विपुल वाखुरे यांनी विधान परिषदेचे आमदार सुधीर तांबे यांच्याकडे पाठपुरावा करून 2015 साली अर्बन बँक कॉलनी ते गुलमोहर रोड रस्त्यासाठी  निधी मिळविला होता. हे काम स्वतः वाखूरे यांनी उभे राहून करून घेतले होते. आज या रस्त्याला दहा वर्षे पूर्ण झाले आहेत. या रस्त्याचे काम उत्कृष्ट  झाले असून आजही हा रस्ता सुस्थितीत असून कुठेही खराब झालेला नाही. या रस्त्याला महानगरपालिकेचे नवनवीन आयुक्त श्री डांगे यांनी भेट देऊन खात्री करून घ्यावी व हा रस्ता “मॉडेल” म्हणून स्वीकारावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.

 

पुण्यातील जंगली महाराज रस्ता गेले 40 वर्षापासून उत्कृष्ट  कामाचे उदाहरण राज्या पुढे आहे. नगर अर्बन बँक कॉलनी रस्ता पाहिल्यानंतर  जगली महाराज रस्त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

news portal development company in india
marketmystique