सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांचा सत्कार

         डॉ. भीमराव आंबेडकर अवॉर्ड जाहीर
सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन पवार यांचे सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांना नवी दिल्ली येथील मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेच्या वतीने डॉ. भीमराव आंबेडकर अवॉर्ड जाहीर झाल्याबद्दल त्यांचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केला. यावेळी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, पीपल्स हेल्पलाईनचे प्रकाश थोरात आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सामाजिक संवेदना जागरुक ठेऊन संदीप पवार यांचे सुरु असलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. समाजाच्या शेवटच्या घटकांना सामाजिक न्याय मिळण्याच्या भावनेने त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पावती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संदीप पवार मागील अनेक वर्षापासून मागासवर्गीय समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने कार्य करत आहे. समाजातील विविध प्रश्‍नांवर त्यांनी आवाज उठवून शोषित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे. सामाजिक चळवळीत त्यांचे सुरु असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना डॉ. भीमराव आंबेडकर अवॉर्ड जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या हस्ते लवकरच पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. सामाजिक चळवळीतील नेते कॉ. कारभारी गवळी, बहुजन रयत परिषदेचे संतोष साळवे आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

news portal development company in india
marketmystique