रेन गेन बॅटरी तंत्राच्या प्रचार-प्रसारासाठी “वंदे मातरम् राष्ट्रयात्रा

अहमदनगर (प्रतिनिधी ) वंदे मातरम् हे भारताचे सजीव अध्यात्म आहे निसर्ग ही सर्वांची आई आहे त्यामध्ये वृक्षवल्ली, वन्यप्राणी आणि सर्व सजीवसृष्टीसह मानवजात ही एकमेकाशी जवळच्या नात्याने गुंफलेली आहे निसर्गाचा दुसरा भाग नद्या,नाले,डोंगर यांचे मोठे शोषन करून माणसाने सजीवसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण केला आहे.वंदे मातरम् ही घोषणा नाही तर आयुष्यभराची जिवनप्रणाली आहे,त्यामुळे लोकभज्ञाक चळवळीने या देशात वंदे मातरम् हे चैतन्यमय अध्यात्म स्विकारले आहे आणि ते राबविण्याची जबाबदारी सर्व भारतीयांवर आली आहे.
भारतीय संविधानाचे कलम (51अ) अन्वये मुलभूत कर्तव्याची स्पष्टता केली आहे.निसर्ग आणि सजीवसृष्टीचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयावर आहे, त्याचबरोबर वंदे मातरम् या राष्ट्रगीतात सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य शामला मातरम् वंदे याची स्पष्टता दिली आहे.वंदे मातरम् राष्ट्रगीतातील उदात्त वस्तुस्थिती निर्मितीची जबाबदारी प्रत्येक भारतीयावर आहे,त्यामुळे वंदे मातरम् हा निसर्गाचा धर्म आहे त्यामुळे तो हिंदू, मुस्लिम,शीख,ईसाई,बौद्ध या धर्मांचा परमधर्म आहे,त्यामुळे वंदे मातरम् हा निसर्गाचा परम धर्म विसरून धर्माच्या नावावर आपसात लाथाळ्या करणारे लोक म्हणजे बुद्धी गहाण ठेवलेले जनावरे आहेत. ग्लोबल वार्मिंग,सर्वत्र पाणीटंचाई,हरित पट्यांचा ऱ्हास यामुळे संपूर्ण मानवजात होरपळत आहे आणि कोरोना महामारी हा त्याचा भाग असल्याचे सिद्ध झाले आहे यावर लोकभज्ञाक चळवळीने लोकांची भक्ती,निसर्गाची भक्ती, एकात्मिक ज्ञान सिद्धांतातून मिळविलेले महानज्ञान व त्यातून हिच ज्ञानभक्ती तर स्वतःच्या स्वार्थापलीकडे जाऊन बजाविलेले कर्तव्य यातून निर्माण झालेले लोकभज्ञाक तत्वज्ञान राबविले जात आहे.भारत सुजलाम सुफलाम खऱ्या अर्थाने निर्माण करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीने रेन गेन बॅटरी या जलसंधारणातील उच्च तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रम सुरू केला आहे.या रेन गेन बॅटरीमुळे प्रत्येक झाडाच्या मुळाशी उन्हाळ्यात देखील किमान ओलावा राखता येणार आहे तर देशभरातील जिरायत शेतकऱ्यांचे रूपांतर हंगामी बागायतदारामध्ये करता येईल त्यातून देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या शुन्यावर येतीलच देशातील तमाम शेतकरी दारिद्र्याच्या खाईतून बाहेर येतील,त्यामुळे या रेन गेन बॅटरीमुळे घरांच्या छतावर पडणारे पाणी जमिनीखाली साठवता येईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विहीरींना किमान आठ महिने पाणी राहू शकेल.शहरी भागांमध्ये सिमेंटच्या जंगलात गुदमरणाऱ्या झाडांना रेन मुळे नवसंजीवनी मिळेल.एकंदरीत देशभरातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावता येईल देशात हरित आवरण वाढविण्यासाठी मदत मिळेल आणि संपूर्ण सजीवसृष्टीला अभयदान मिळेल आणि म्हणून या संघटनेने “जय किसान जय निसर्गपाल” ही घोषणा जारी केली आहे.सध्याच्या राज्यकर्त्यांनी खरे अध्यात्म स्विकारले नाही तर वंदे मातरम् फक्त एक कृत्रिम बाब ठरणार आहे.आपल्या आईला वृद्धाश्रमांत ठेऊन वर्षातून एकदा पाय धरायचे या बेगडीपणातून मानवी मुल्यांचा संपूर्ण ,त्यामुळे प्रत्येक भारतीयाने आपण एकविसाव्या शतकामध्ये जगतो आणि निसर्ग या आपल्या आईची सेवा करतो याची प्रचिती दिली पाहिजे या संघटनेचे कार्यकर्ते व्यापक स्वरूपात वंदे मातरम् यात्रा आयोजित करणार आहे यासाठी अॅड.कारभारी गवळी,अशोक सब्बन,प्रकाश थोरात, प्रा.माधवराव देसाई,अॅड.संजय जव्हेरी,शाहीर कान्हू सुंबे,वीर बहाद्दूर प्रजापती,ओम कदम,अजय चौगुले,विठ्ठल सुरम, अंबिका नागुल आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहे.

news portal development company in india
marketmystique