रेन बॅटरी” या तंत्रामुळे भारत सुजलाम सुफलाम होणार

देशभर एकात्मिक हरीत क्रांती पर्वाला सुरुवात – लोक भज्ञाक चळवळीचा दावा 

“रेन बॅटरी” या तंत्रामुळे भारतातील हंगामी बागायती, धनराई, शहरी भागातील रस्त्याच्या कडेच्य झाडांना वर्षभर जमीनीखाली ओलावा राहील याची व्यवस्था त्याशिवाय शहर आणि ग्रामीण भागातील इमारतींवर पडणारे पावसाचे पाणी जमीनीमध्ये मुरविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्याचबरोबर देशभर एकात्मिक हरीत क्रांती करता येईल असा दावा लोकभज्ञाक चळवळीने केला आहे.

शेतक-यांच्या आत्महत्या शुन्यावर आणणे आणि शेतकऱ्यांना दारीद्रयाच्या खाईतून बाहेर काढण

यासाठी रेन बॅटरी हे तंत्र क्रांतीकारक ठरणार आहे. परंतु देशातील हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना आणि रेन बॅटरीचा वापर करु इच्छिनाऱ्यांना सरकारने ७० टक्क्यापर्यंत अनुदान दिले पाहीजे, असा आग्र लोकभज्ञाक चळवळीने केला आहे. आजपर्यंत जलसंधारण आणि वृक्ष लागवड, संवर्धन वेगवेगळया पदधतीने केली जात होती व त्यासाठी सरकारचे दोन वेगळे खाते कार्यरत आहेत. परंतू जलसंधारण आणि फळबागायती एकाच खात्यामार्फत राबविणे आवश्यक आहे. धनराई योजने अंतर्गत हंगामी बागायती शेतीमध्ये चिंच, आवळा, बोर, आंबा, खजुर इत्यादी फळं देणाऱ्या झाडांची लागवड करता येवू शकते आणि प्रत्येक झाडापासुन पाच फुट अंतरावर, पाच फुट खोलीचा आणि ३ बाय ३ चा खोल् खड्डा खोदून त्यामध्ये बारीक दगड, विटांचे तुकडे टाकुन खड्डयाच्या वरच्या बाजुला मुरूमाने हा खड्डा बंद केला आणि उताराने आलेले पावसाचे पाणी या खड्डयात वळविले तर या खड्डयातुन जलसंधारण मोटे प्रमाणात होते व त्याच वेळेला झाडाच्या मुळाशी वर्षभर किमान ओल टिकून राहते. त्यामुळे उन्हाळयात सिंचन पाणी दिले नाही तरी ही फळझाडे नक्की जगतात. त्यामुळे शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपयांचे वर उत्पन्न मिळू शकते. त्याचबरोबर प्रत्येक एक एकर जमीनीच्या उताराच्या बाजुला २० बाया १० आणि १५ फुट खोलीच्या खड्डयात दगड गोटे टाकुन वरच्या बाजुला मुरुमाने खड्डा बंद केला आणि पावसाचे वाहून येणारे पाणी या खड्डड्याकडे वळविले तर जलसंधारण मोठ्या प्रमाणात होते आणि बाष्पाभवन ९० टक्क्यापर्यंत नियंत्रित केले जाते. जमीनीखाली जलसंधारण होवून किमान ओलावा वर्षभर टिकून राहतो. त्यामुळे देशातील अल्पभुधारक शेतक-यांना हंगामी बागायतदार होण्याची संधी या रेन बॅटरीमुळे उपलब्ध झाली आहे. आजपर्यंत जलसंधारणाच्या वेगवेगळया तंत्रापेक्षा हे तंत्र अधिक प्रगत आहे. त्यामुळे जलसंधारण होत असतांनाच ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न देखील धनराई योजनेमुळे मोठ्या प्रमाणात सोडविता येणार आहे. एकटया महाराष्ट्रात दोन कोटीचे वर हंगामी बागायतदार आर्थिक फायद्याची शेती करु शकणार आहे.

शहरी किंवा ग्रामीण भागातील घरांच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी बोअरवेल शेजारी रेन बॅटरी लावून मोठ्या प्रमाणात जलसंधारण करता येते. त्यामुळे पिण्याच्या किंवा वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. एकंदरीत पाणी टंचाई आणि ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडविण्यासाठी रेन बॅटरीला पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शुन्यावर येतील आणि शेतकरी दारिद्रयाच्या खाईतून बाहेर येईल असा विश्वास लोकभज्ञाक चळवळीने व्यक्त केला. उन्हाळयात पाणी टंचाईमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम यातुन संपविता येणार आहेत आणि त्याचवेळेला टँकरमुक्ती ७० टक्के पर्यंत करता येईल.

अॅङ कारभारी गवळी, संजय बारस्कर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालींदर बोरुडे, शाहीर कान्हु सुंबे, अशोक भोसले आदी कार्यकर्ते ही चळवळ यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

news portal development company in india
marketmystique