जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचे स्मारक उभारण्यात यावे – ऍड.कारभारी गवळी

 

                                                                                                                           

          अहमदनगर(प्रतिनिधी) भारतीय न्यायदानातील निर्भयता आणि निस्पृहता जगभर पसरवीणारे न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे  हे न्यायदानातील दीपस्तंभ आहेत. जुन्या जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत न्या.राम शास्त्री प्रभुणे यांचे स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी  लोकभज्ञाक चळवळीने केली आहे.

अहमदनगर जिल्हा न्यायालयाला 200 वर्षे झाली. पन्नास वर्षापूर्वी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत  न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशात कायद्याचे राज्य  खऱ्या अर्थाने आवश्यक होते. परंतु न्याय संस्थेमध्ये असणारा भ्रष्टाचार आणि अनागोंदी यामुळे सर्व सामान्य माणसाला सामाजिक आणि आर्थिक न्याय आजपर्यंत मिळालेला नाही.

         सामान्य माणसाला रस्त्यावर सत्याग्रह करणे आणि न्यायालयाचे दारं ठोठावणे याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परंतु  न्याय संस्थे मध्ये न्याय मिळवण्यासाठी होणारा वीलंब फार मोठा आहे. त्यामुळे न्याय मागणाऱ्याला फक्त कोर्टाच्या वाऱ्या कराव्या लागतात अशी खंत लोक भज्ञाक चळवळीने व्यक्त केली आहे.

न्यायमूर्ती राम शास्त्री प्रभुणे यांच्या सारखा मोठा न्यायाधीश स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत होऊ शकलेला नाही, याची खंत ,संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे न्याय संस्थेमध्ये काम करणारा न्यायाधीश असो किंवा वकील असो प्रत्येकाने न्यायभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यांचा वसा उचलला पाहिजे आणि संपूर्ण आयुष्य भर न्याय भक्ती आणि न्याय कर्म भक्ती राबविली पाहिजे असा आग्रह लोकभज्ञाक चळवळीने केला आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म या भारतीय मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचे मानबिंदू आहेत गेल्या पाच हजार वर्षातील लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यावर आधारित लोक भज्ञाकचळवळ व्यापक होत आहेआणि सध्याच्या लोकशाहीला उन्नत पातळीवर नेण्यासाठी व लोकभज्ञाक शाही राबविण्यासाठी या चळवळीचा प्रयत्न आहे.अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीचा भाग रिकामाआहे आणि न्यायमूर्ती राम शास्त्री प्रभुणे यांच्या पुतळ्याची देखभाल होत नाही.

ऑड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सूंबे, संदीप पवार, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, ओम कदम, आदी. कार्यकर्ते ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.

news portal development company in india
marketmystique