नगर एमआयडीसी मध्ये खा. लंके यांचा आमी संघटनेच्या वतीने सत्कार


नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करुन जेंव्हा बदल घडवून आणले तेंव्हाच मी सत्कारास पात्र ठरणार –  नवनिर्वाचित खासदार निलेश लंके

(प्रतिनिधी)- राजकीय लोक नेहमी भाषण देतात, पण प्रत्यक्षात काम काही करत नाही. मात्र मी काम करणारा खासदार आहे. मी वेळ वाया घालवत नाही लोकांचे प्रश्‍न मार्गी लावतो. नगरच्या एमआयडीसीचा विकासात्मक कायापालट करुन जेंव्हा बदल घडवून आणले तेंव्हाच मी सत्कारास पात्र ठरणार असल्याची भावनिक साद नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी एमआयडीसीच्या उद्योजकांना घातली.
अहमदनगरच्या एमआयडीसीत खासदार निलेश लंके यांनी भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला. आमी संघटनेच्या वतीने खासदार लंके यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक योगिराज गाडे, संजय गारुडकर, संदेश कार्ले, दत्ता जाधव, आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उपाध्यक्ष महेश इंदानी, राजेंद्र कटारिया, संजय बंदिष्टी, खजिनदार सुमित लोढा, राजेंद्र शुक्रे, रोहन गांधी, सचिन पाठक, सुमित सोनवणे, सतीश गवळी, सुनील कानवडे, समीर पटवर्धन, विलास तनपुरे, चिन्मय सुकटणकर, संतोष शिंदे, सागर निंबाळकर, प्रफुल्ल पारख, सुभाष गुगळे, विश्‍वनाथ पोंधे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

news portal development company in india
marketmystique