ग्लोबल वार्मिंग विरुद्ध वृक्षरोपण चळवळ प्रभावी उपाय – प्रशांत वाकचौरे

कर्जत, ता. १६ वृक्षरोपण आणि त्याचे संगोपन ही काळाची गरज असून ती समाजाभिमुख लोकभिमुख व्हावी असे प्रतिपादन उप अभियंता प्रशांत केले आहे.सार्वजनिक बांधकाम उपविभाग कर्जत व सामाजिक संघटनेतर्फे वृक्षारोपण सप्ताह पार पडला.

मिराजगाव कर्जत बारामतीर स्त्यावर सात दिवसांत तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व सर्वजनिक बांधकाम उपविभागातील अधिकारी, उपस्थित होते. या वेळी म्हणाले कर्मचारी” स्वच्छ कर्जत! सुंदर कर्जत!”आणि हरित कर्जत! बनविण्यासाठी   सामाजिक संघटनांचे  कार्य आदर्शव प्रेरणादायी आहे. त्यांनी एक हजार तीनशे पन्नास दिवस महाश्रमदान करून सुमारे ८२ हजार वृक्षांची लागवड केली आहे. बेसुमार वृक्षतोड झाल्याने निर्सगाच्या संतुलनासाठी वृक्षारोप करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढेयावे.

शाखा अभियंता महेंद्र बागुल म्हणाले ग्लोबल वार्मिंग मुळे जागतिक तापमानात बदल होत असून अवेळी पावसामुळे निसर्गचक्र धोक्यात आले आहे. यासाठी ग्लोबल वार्मिंग विरुद्ध जागतिक पातळीवर लढा उभारला गेला पाहिजे. यांनी आभार मानाले कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवस किंवा प्रिय व्यक्तीच्या पुण्यस्मरणानिमित्त झाड लावून त्या आठवणी कायमस्वरूपी जतन कराव्यात, असे आवाहन सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी केले आहे.

news portal development company in india
marketmystique