संविधानाने जाहीर केलेले मुलभुत कर्तव्य टाळणाऱ्या व्यक्तीवर किंवा लोकसेवकावर मुलभुत अधिकार भंगाचा ठपका ठेवणार –लोकभज्ञाक चळवळ
अहमदनगर – भारतीय संविधानातील तरतुदीनुसार प्रत्येक नागरीकाने कायद्याचे पालन केलेच पाहीजे. त्याशिवाय संविधानाचे कलम ५१अ खाली मुलभुत कर्तव्ये घोषीत आहेत. ही मुलभुत कर्तव्ये करण्यासाठी प्रत्येक भारतीय नागरीकाला राज्यघटना- पाल म्हणून मान्यता आहे. त्याचबरोबर निसर्गाचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयावर ठेवण्यात आलेली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. प्रत्येक भारतीयाने मोठ्या प्रमाणात आपल्या परिसरात वृक्ष लागवड करुन जोपासणा केलीच पाहीजे. त्याशिवाय पर्यावरणाचा प्रश्न सुटणार नाही.
निसर्गाची भक्ती, ग्लोबल वार्मिंग होण्याचे कारण व त्यामागील विज्ञान आणि प्रत्यक्ष पर्यावरणाचे प्रश्न सोडविण्यासाठीचे कार्य यातुन निसर्गभज्ञाक चळवळ व्यापक होत आहे. सर्व देशवाशियांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करुन जोपासणा केली तर भारत हा ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न संपविण्याच्या कामी सर्व देशांचा नेता ठरणार आहे. याच कारणासाठी भारतीय संविधानाने प्रत्येक नागरीकाला निसर्ग-पाल ठरविले आहे.

अॅङ कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हु सुंबे, विठठल सुरम इत्यादी कार्यकर्ते लोकभज्ञाक चळवळ व्यापक करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.