सामान्यांसाठी लोकभक्ती,ज्ञानभक्ती आणि निष्काम कर्मभक्ती यांच्या अभावामुळे उज्वल निकम पराभूत- ऍड.कारभारी गवळी 

धारावीच्या मतदारांनी उज्वल निकम यांचे पानिपत केले.

सामान्यांसाठी लोकभक्ती,ज्ञानभक्ती आणि निष्काम कर्मभक्ती यांच्या अभावामुळे उज्वल निकम यांच्या ठिकाणी लोकांची भक्ती,लोकांच्या प्रश्नांचे ज्ञान,आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याचे तंत्र त्याशिवाय लोकांसाठी निष्काम कार्य करण्याची प्रवृत्ती कधीही नव्हती. त्यामुळे धारावीच्या लोकसभा मतदारांनी उज्वल निकम यांचे पानिपत केले. समाजातील दुबळ्या घटकांसाठी सातत्याने काम करणाऱ्या वर्षा गायकवाड यांना लोकांनी निवडून दिले.यातून भारतातील लोकशाही ही अतिशय विकसित झालेली आहे,ही बाब सर्व जगाला कळाली. डॉक्टर, वकील होणे सोपे आहे परंतु लोकांची भक्ती व त्यांच्यासाठी काम करण्याची प्रवृत्ती हा मोठा कर्मयोग आहे. भारतामध्ये निवडून येण्यासाठी शैक्षणिक पात्रता हवी असे काही लोकांचे म्हणणे होते,परंतू समाजाच्या नाडीवर बोट असणे आणि त्यांच्यासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे मोठा अनुभव असतो, ही बाब धारावी मतदारांनी जगाला दाखविली.
अॅड.उज्वल निकम हे महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील होते,परंतू त्यांनी ज्याप्रकरणात फार मोठी प्रसिद्धी आहे त्या मध्ये रस दाखवला. डाॅ.नरेंद्र दाभोळकर,काॅम्रेड.गोविंदराव पानसरे यांचे हत्याकांड करणाऱ्यांना सजेवर पाठविण्यासाठी अॅड.उज्वल निकम यांची कामगिरी शुन्य आहे. विशेष सरकारी वकील असताना सुद्धा शेंडी, शेंदूर विचारसरणीला अॅड.उज्वल निकम शरण होते ही बाब आता सिद्ध झालेली आहे.
संसदीय लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधी होणे ही बाब अतिशय मोठी आहे. स्वतःचे सर्वसामान्यासाठी काहीएक काम नाही परंतू देशात मोदीलाट आहे असा गैरसमज करून निवृत्त जीवनाचे सोने करू पाहणाऱ्या अॅड.उज्वल निकम यांचा सुज्ञ मतदारांनी डिच्च्यूकावा केला, ही बाब अतिशय मोठी आहे. भाजपच्या प्रत्येक उमेदवाराने मतदारांना विकत घेण्यासाठी पैसा पाण्यासारखा खर्च केला,परंतू आपले संपुर्ण आयुष्य जो उमेदवार लोकांसाठी खर्च करतो तोच उमेदवार निवडून येतो, ही बाब सिद्ध झालेली आहे.धारावी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी काम केल्याचा पुरावा अॅड.उज्वल निकमांना ठेवता आला नाही.श्रीमंती थाटात राहणाऱ्या आणि वरिष्ठ वर्गाला उपलब्ध होणाऱ्या अॅड.निकमांना सामान्य मतदारांचे मन वळवता आले नाही. कायद्याचा तज्ञ असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि राज्यघटना-पाल अॅड.निकम नाहीत, हे मतदारांनी स्पष्ट रितीने जाहीर केले.राज्यघटना-पाल हा भारतीय संविधानाचा आत्मा आहे. वरवरचा घटनेचा अभ्यास करून कोणालाही राज्यघटना-पाल होता येत नाही,परंतू डाॅ.वर्षा गायकवाड यांनी कोरोनाच्या काळात सर्व शाळा बंद असताना सुद्धा आॅनलाईन पद्धतीने मुलांचे शिक्षण चालू ठेवले व त्यांचे शैक्षणिक दोन वर्षे खंडित होऊ दिले नाही, ही बाब समाजाला आणि मतदारांना नक्की कळाली.
या देशात महात्मा गांधीजी जगाला कळाले,परंतू काही लोकांना गांधी चित्रपट पाहिल्यानंतर गांधीजींची ओळख झाली. अशा कर्मकांडात गुंतलेल्या नेत्यांच्या नावावर मतं मिळत नाहीत ही बाब देखील धारावीच्या मतदारांनी जगाला दाखविली. अॅड.निकम यांनी पुढील पाच वर्ष धारावीसाठी काम केले पाहिजे आणि लोकसभेच्या मानाच्या खासदारकीवर आणि मंत्रीपदावर डोळा ठेवून एका रात्रीत हळद पिऊन गोरा होण्याचा निकम यांचा व उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या अंगलट आला.लोकभज्ञाक तत्वप्रणाली हे व्रत आहे याची जाणीव सर्वांना झाली, असे अॅड.कारभारी गवळी यांनी सांगितले.यावेळी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे,ओम कदम,शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी उपस्थित होते.

news portal development company in india
marketmystique