दक्षिण नगर मतदारसंघ मतदारां मुळे सत्तापेंढारी आणि घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर

येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात विखे पराभव पॅटर्न राबविणार – लोकभज्ञाक चळवळ

अहमदनगर (प्रतिनिधी ) घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता,संपत्ती व प्रतिष्ठेचे केंद्रीकरण करून आणि इतरांना फक्त वापरून घेण्याची प्रवृत्ती विखे कुटुंबाने अनेक दशके चालू ठेवली निळवंडेच्या पाण्यापासून वीस ते पंचवीस वर्षे दुष्काळी पट्ट्यातील जनतेला वंचित ठेवले आणि फक्त प्रवरेच्या 40 गावांसाठी डुबक पध्दतीची शेती केली. हजारो लोकांना कामापुरते वापरून काम झाल्यानंतर फेकून देण्याची पद्धती त्यांनी वापरली.स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरदेखील सुज्ञ आणि काम करणाऱ्या लोकांना सत्ता आणि कायदा राबवण्याची संधी मिळणार नाही याची काळजी विखे कुटुंबाने घेतली.लॅण्ड व्हॅल्यू कॅप्चर योजनेखाली निवारावंचित लोकांना 35 लाखाचे घर फक्त 7 लाखात मिळण्याची शक्यता असताना मा.राधाकृष्ण विखे गृहनिर्माण मंत्री असताना या मागणीला कवडीची किंमत दिली नाही व त्यांचे चिरंजीव खासदार असताना घरकुल वंचितांबद्दल एक शब्द देखील त्यांनी काढला नाही. मेरे देशमें मेरा अपना घर आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दहा वर्ष आंदोलन चालवून अशा राज्यकर्त्यांमुळे त्यांना यश आले नाही.

लोकभक्ती, लोकांच्या प्रश्नाबद्दलचे सम्यक ज्ञान, लोकांचे प्रश्न सोडविण्याचे तंत्र,लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी निष्काम कार्य करण्याची प्रवृत्ती विखे परिवारात दिसली नाही.
सत्ता आणि मंत्रीपदे मिळविण्यासाठी नितीमत्ता सोडून अनेक पक्ष विखे कुटूंबाने बदलले.स्वातंत्र्य ज्या कारणासाठी मिळविले त्या तत्वांशी विखे कुटूंबाने पुर्णतः फारकत घेतली. पैशाने मतं विकत घेता येतात आणि जातीचा वापर करता येतो या तत्वावर उभे असलेले साम्राज्य पुर्णपणे नष्ट झालेले आहे.विखे कुटुंबाच्या पराभवामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला लोकप्रतिनिधी होता येईल अशी आशा निर्माण झाली आहे.देशभरात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राज्यघटना-पाल म्हणुन पुढे यावे अशी लोकभज्ञाक चळवळीने कळकळीचे आवाहन केले आहे. दक्षिण नगर मतदारसंघ सत्तापेंढारी आणि घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर पडला याचा आनंद सामान्य नागरिकांना झाला आहे.येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये विखे पराभव पॅटर्न पुऱ्या राज्यात लागू करण्यासाठी लोकभज्ञाक चळवळ प्रयत्नशील आहे. यासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे,ओम कदम,शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.

news portal development company in india
marketmystique