सेवा निवृत्ती नंतरचा काळ हा बोनस लाईफ – माजी आमदार निलेश लंके

 

चाकोरी बद्ध जीवन जगलात आता आयुष्यात राहून गेलेली कामे करुन घ्यावी व समाजाला समर्पित आनंदी जीवन जगावं माजी आमदार दादाभाऊ कळमकर

अहिल्यानगर – शासकीय सेवेत कामाचा फार मोठ्या प्रमाणात ताण असतो.सेवा करत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष देता येत नाही. नोकरी करत असतानाही आपला उर्वरित वेळ समाजासाठी देऊन लोकांना मदत करणारी ही अनेक शासकीय सेवक आहेत.

चाकोरी बद्ध जीवन जगलात आता आयुष्यात राहून गेलेली कामे करुन घ्या- आमदार दादाभाऊ कळमकर .

सेवानिवृत्ती नंतरचा काळ हा बोनस लाईफ आहे. या पुढे आयुष्याची दुसरी सुरुवात म्हणून आपले छंद, आवडी, कला, झोपसल्या पाहिजे. साळवे हे एक राजकीय पक्षाचे सन्माननीय नेते असल्याने त्यांनी यापुढे राजकारणात आपला चांगला ठसा उमटवून समाजाचं एक पाऊल पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत. असे राज्य परिवहन वाहक नियंत्रक व राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष मा. विनोद साळवे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी  माजी आमदार निलेश लंके यांनी प्रतिपादन  केले.

माजी आमदार कळमकर आपल्या भाषणात म्हणाले,आपण चाकोरी बद्ध जीवन जगलात आता आयुष्यात राहून गेलेली कामे करुन घ्यावी व समाजाला समर्पित आनंदी जीवन जगावं.
या वेळी माजी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष शामराव वागस्कर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रकाश पोटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, शहा नवाज खाण, डॉ स्मिता तरटे,ऍड.शु भांगी जाधव जिल्हा अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस  , संदीप पवार, प्रकाश थोरात, संजय मंडलिक सर, आदी उपस्थित होते.

news portal development company in india
marketmystique