गुरुवारी महापालिकेत निसर्गप्रेमी संघटना व लोकभज्ञाक चळवळीच्या कार्यकर्त्यांची बैठक

हरित शहर करण्यासाठी होणार चर्चा

ग्लोबल वॉर्मिंग विरोधात जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय निसर्गपाल घोषणा

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरणाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन वृक्षरोपण व संवर्धनासाठी सरसावलेल्या शहरातील निसर्गप्रेमी संघटना, लोकभज्ञाक चळवळीचे कार्यकर्ते व निसर्गपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखवलेल्या कार्यकर्त्यांची बैठक महापालिका प्रशासनाच्या वतीने गुरुवारी (दि.30 मे) आयोजित करण्यात आली आहे. ग्लोबल वॉर्मिंग विरुद्धच्या लढाईत सामील होण्यासाठी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय निसर्गपाल अशी घोषणा जारी करण्यात आली आहे.महापालिकेचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महापालिकेत ही बैठक बोलविण्यात आली आहे. यामध्ये नॅनो धनराई व अजीवन निसर्गपाल योजनेबाबत चर्चा केली जाणार आहे. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन उपस्थित राहणार आहेत. या बैठकीसाठी अजीवन निसर्गपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखवलेली ॲड. अनिल सरोदे, ॲड. संदीप वांढेकर, कॉ. बाबा आरगडे, कॉ.डॉ. महेबूब शेख, अशोक सब्बन, ॲड. नामदेव दरंदले, मनसुख गांधी, बाळासाहेब पवार, शाहीर कान्हू सुंबे, ॲड. लक्ष्मण पोकळे, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, विश्वनाथ पाटोळे (पुणे ) जालिंदर बोरुडे, ललिता गवळी, अशोक कुलकर्णी, ॲड. समीर पटेल, ॲड. राजेश कावरे, ॲड. बबन सरोदे, ॲड. सारस क्षेत्रे, ॲड. कारभारी गवळी आदी उपस्थित राहणार आहेत.

शहर निसर्ग श्रीमंत करण्यासाठी आणि प्रत्येक घर आणि बंगल्याच्या आवारात नॅनो धनराई उभी करण्यासाठी तसेच आपल्या घराच्या आसपास आणि कॉलनीत मोठ्या प्रमाणात झाडे लावून वाढविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांचे विचार समजून घेऊन महापालीका सकारात्मक कारवाई करणार आहे. महापालिका उपायुक्त मुंडे यांनी लोकभज्ञाक चळवळीच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली असता, नॅनो धनराईन आणि आजीवन निसर्गपाल संकल्पना जाणून घेतली. शहरात 2 हजार निसर्गपाल तयार झाले पाहिजे, यासाठी महापालिका देखील मदत करणार आहे.निसर्ग संवर्धन आणि वृक्ष लागवड करण्यासाठी हजारो लोकांना सहभागी करुन घेण्याचा या चळवळीच्या वतीने प्रयत्न राहणार आहे. प्रत्येक निसर्गपाल आपल्या घराभोवती नॅनो धनराई उभारणार असून, त्याचबरोबर निसर्गपाल राहत असलेल्या परिसरात नागरिकांना धनराई उभारण्यात सहकार्य करणार आहे. महापालिकेच्या रस्त्याच्या कडेला झाडे लावून त्यांचे संवर्धन निसर्गपाल नागरिकांच्या मदतीने केले जाणार असून, यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ग्लोबल वार्मिंग विरुद्ध लढण्यासाठी झाडे लावली पाहिजेत आणि जगवली पाहिजे अशी भावना उपायुक्त मुंडे यांनी व्यक्त केली आहे. शहरातील सामाजिक व निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांनी या बैठकीला आवर्जून उपस्थित राहावे असे महापालिका उद्यान विभागाचे प्रमुख शशिकांत नजन व ॲड. कारभारी गवळी यांनी आवाहन केले आहे.

news portal development company in india
marketmystique