
आपल्या विविध मागण्यांसाठी अनेक पक्षांकडून, संघटनांकडून, नागरिकांकडून नेहमीच आंदोलने केली जातात. मोर्चा, धरणे, उपोषण वगैरे त्यांचे स्वरूप असते. अनेक आंदोलने नेहमीच्या नावाने आणि ठरलेल्या पद्धतींनुसार होतात. अहिल्यानगरमध्ये मात्र पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद या संघटनांच्या पुढाकारातून अनोख्या नावांची आंदोलने केली जातात. त्यांचे स्वरूप इतर आंदोलनांसारखेच असले तरी आंदोलनाला नाव मात्र अतिशय वेगळे दिलेले असते. त्यासाठी वापरण्यात येणारे शब्द अनेकदा पूर्वी ऐकलेले नसतात. त्यांचा अर्थही लावता येत नाही. मात्र ही नावे ठरविणारे संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी त्यांच्या अर्थांसह स्पष्टीकरण देतात. अर्थात त्यांनी दिलेल्या नावांची अद्याप कोणीही कॉपी केल्याचे दिसून येत नाही.
अॅड. कारभारी गवळी आणि भारतीय जनसंसदेचे अशोक सब्बन यांच्या पुढाकारातून ही अनोख्या नावांची आंदोलने होत असतात. दोघेही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून पुढे आलेले आहेत. मात्र, स्वत: अण्णांना जमली नाहीत, अशी नावे ते आंदोलनांना देतात. याचे बहुतांश श्रेय वकील असलेल्या गवळी यांना जाते. अर्थात वेगळ्या नावाचे आंदोलन म्हणून त्याची चर्चा होते, प्रसिद्धीही मिळते. शेवटी लढा त्याच यंत्रणेविरूद्ध असतो. त्यामुळे वेगळे नाव दिले म्हणून दरवेळी यंत्रणा हलतेच असे नाही. त्यानंतर मग आणखी नवे नाव घेऊन आंदोलन केले. जाते. लोक कर्कासूर, बागोड्या सत्याग्रह, ढब्बू मकात्या, सत्ता पेंढारी, डिच्चू कावा, महानगर पावीर सूर्यनामा, लोकमकात्या, लोकभज्ञाक असे काही नवीन शब्द त्यांच्या आंदोलनातून पुढे आले. आतापर्यंत झालेली काही उदाहरणे पाहू. तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचे देशात संशोधन झाले नाही, असे सांगणारे दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी यांच्या या विधानाच्या निषेधार्थ गांधी यांना लोक कर्कासूर पदवी देऊन आंदोलन केले.
शहरातील उद्यानासाठी महापालिका आयुक्त्यांच्या पुतळ्याला उद्यानातील खांबाला बांधून बागोड्या सत्याग्रह पुकारला होता. मात्र, आश्वासनानंतर तो मागे घेण्यात आला होता.
वंचितांना घरकूल मिळवून देण्याच्या आंदोलनाला मेरे देश मे मेरा घर असे भावनिक नावही दिले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही खऱ्या अर्थाने देशात स्वराज्य आणि कायद्याचे राज्य उभे राहू शकलेले नाहीत असं म्हणत ‘ढब्बू मकात्या’ ला सत्यांजली वाहत आंदोलन करण्यात आले.
सत्तेला हापापलेल्या राजकीय लोकांच्या विरोधात डिच्चू कावा आंदोलन करण्यात आले. सरकारी अधिकारी व पोलीसांना हाताशी धरुन वर्षानुवर्षे ताब्यात असलेली शेतजमीन मूळ मालकांच्या ताब्यात मिळविण्यासाठी ‘काळी आई ताबा पडताळणी आंदोलन’ करण्यात आले.
शहरात नागरी सुविधांची वाताहात झाल्याच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेस समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आले. घोटाळेबाज नीरव मोदीची खंडाळा (ता. कर्जत) येथील जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी ‘काळी आई मुक्ती संग्राम’ असे आंदोलन देऊन आंदोलन केले.
शहरातील उद्यानासाठी महापालिका आयुक्त्यांच्या पुतळ्याला उद्यानातील खांबाला बांधून बागोड्या सत्याग्रह पुकारला होता. मात्र, आश्वासनानंतर तो मागे घेण्यात आला होता. वंचितांना घरकूल मिळवून देण्याच्या आंदोलनाला मेरे देश मे मेरा घर असे भावनिक नावही दिले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही खऱ्या अर्थाने देशात स्वराज्य आणि कायद्याचे राज्य उभे राहू शकलेले नाहीत असं म्हणत ‘ढब्बू मकात्या’ ला सत्यांजली वाहत आंदोलन करण्यात आले.
सत्तेला हापलेल्या राजकीय लोकांच्या विरोधात डिच्चू कावा आंदोलन करण्यात आले. सरकारी अधिकारी व पोलीसांना हाताशी धरुन वर्षानुवर्षे ताब्यात असलेली शेतजमीन मूळ मालकांच्या ताब्यात मिळविण्यासाठी ‘काळी आई ताबा पडताळणी आंदोलन’ करण्यात आले.
शहरात नागरी सुविधांची वाताहात झाल्याच्या निषेधार्थ दिल्लीगेट वेस समोर महानगर पावीर सूर्यनामा आंदोलन करण्यात आले. घोटाळेबाज नीरव मोदीची खंडाळा (ता. कर्जत) येथील जमीन मूळ शेतकऱ्यांना परत मिळण्यासाठी ‘काळी आई मुक्ती संग्राम’ असे आंदोलन करण्यातत आले.
लोकशाही दसरा साजरा करीत रावणाचे दहन करण्याऐवजी लोकमकात्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा कोथळा काढून जोडे. मारण्यात आले. सार्वजनिक स्वरुपातील कर्तव्याबाबत मला काय त्याचे? अशी भूमिका घेणारे म्हणजे ‘लोकमकाते’. ते लोकशाहीला मारक असतात. लोकमकात्या मुर्दाबाद, लोकभज्ञाक जिंदाबाद, जय शिवाजी जय डिच्चू कावा अशा घोषणा देत लोकमकात्याला जाहीर विसर्जित करण्यात आले.अशी किती तरी वेगळ्या नावांची आंदोलने झाली आहेत, होत आहेत.
विजयसिंह होलम
महाराष्ट्र टाईम्स