आचारसंहिता संपू द्या, अनेक भ्रष्टाचारी अधिकारी माझ्या रडारवर…खा.निलेश लंके
आचारसंहिता संपू द्या, अनेक भ्रष्टाचारी अधिकारी माझ्या रडारवर…खा.लंकेंचा इशारा
नगर : मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांच्यावर लाच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकारानंतर आता खा.निलेश लंके यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रया दिली आहे. मनपा आयुक्त जावळे भ्रष्टच आहेत, त्यांनी अनेक लोकांचे पैसे खाल्ले असून कारवाई योग्यच असल्याच खा.लंके यांनी म्हटले आहे. त्याचवेळी नगर जिल्ह्यातील प्रशासनातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपू द्या अनेक भ्रष्टाचारी अधिकारी माझ्या रडारवर आहेत. जिल्हा परिषदेत जल जीवन मिशनच्या कामात अनेक अधिकाऱ्यांनी करोडो रूपयांचा भ्रष्टाचार केला आहे, ते सगळेच रडारवर असल्याची प्रतिक्रया खा.लंके यांनी दिली आहे.