पाटबंधारेचा कार्यकारी अभियंता एसीबीच्या ताब्यात तर नगररचनाकार फरार

बीड एसीबीने एकाच दिवशी दोन कारवाया करून  पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व दुसऱ्या कारवाईत दोन खासगी व्यक्तींना एसीबीने ताब्यात घेतले आहे.

तलावातून काढलेला गाळ शेतात टाकण्याची परवानगी मिळावी यासाठी शेतकरी पाटबंधारे विभागात गेला होता. हि परवानगी देण्यासाठी २८ हजार रुपयांची लाच घेताना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता राजेश आनंदराव सलगरकर यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पाटबंधारे विभागात खळबळ उडाली आहे.तर दुसऱ्या कारवाईत अकृषी पवानगीसाठी नगररचना कार्यालयात निलेश पवार व नेहाल शेख या खाजगी व्यक्तींना १५ हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली. तर ज्याच्यासाठी लाच घेत होते तो लाचखोर नगररचनाकार प्रशांत शिवाजी डोंगरे (वय २९) हा मात्र फरार झाला आहे. दरम्यान एसीबीच्या या कारवायांनी जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

news portal development company in india
marketmystique