आधुनिक निसर्ग पाल व सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मोठे योगदान!
अहमदनगर (प्रतिनिधी)- निसर्गभज्ञाक चळवळ ही लोकभज्ञाक चळवळीची दुसरी बाजू असून, सजीव सृष्टीच्या कल्याणासाठी व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी योगदान देत आहे. निसर्गपाल हे ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या मार्गाने जाणारे आधुनिक निसर्ग मित्र असल्याचे लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांना लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने विश्व निसर्गपाल म्हणून वंदन केले आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानातून सर्व सजीवांची चिंता वाहिली. तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे असे तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून सांगून विश्वातील सर्व सजिव चैतन्याबाबतची आपुलकी दाखवली आहे. निसर्गभज्ञाक जीवनपद्धती ही भारतातील परंपरेने आलेली जीवनपद्धती असून, त्यामध्ये निसर्गाची भक्ती निसर्ग बाबतचे सखोल ज्ञान आणि निसर्गाच्या नियमांशी आधारित कार्याला महत्त्व होते. परंतु मधल्या काळात भारतातील सुशिक्षित लोकांनी पाश्चिमात्य चंगळवादाचा स्वीकार केला. त्यामुळे आज अनेक आजारांना लोक बळी पडत आहे. कोरोना महामारीमध्ये योगातील प्राणायाम, आसन तर आयुर्वेद काढ्यांमुळे लक्षावधी लोकांची प्रतिकारशक्ती वाढल्यामुळे त्यांना जीवदान मिळाले. निसर्गभज्ञाक जीवन पद्धतीचे पुर्नस्थापन भारतात होत आहे आणि सर्व जगाला निसर्गभज्ञाक जीवन पद्धती मार्गदर्शक ठरणार असल्याचे म्हंटले आहे.
लोकभज्ञाक चळवळीच्या माध्यमातून भारतातील लोकशाहीचे लोकभज्ञाक संसदीय लोकशाहीमध्ये करण्यासाठी कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्यामध्ये लोकांची भक्ती, लोकांचे प्रश्न आणि त्यांचे प्रश्न सोडविण्याचे तंत्र यामध्ये ज्ञानभक्ती तर लोकांसाठी सातत्याने काम करणे याला कर्मभक्ती असे लोकभज्ञाक चळवळीने माणले असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी सांगितले आहे.
यापुढे सरकार आणि निमसरकारी सर्वांनी सार्वजनिक सुट्टी ही नेचर हॅपी डे म्हणून साजरी करावी आणि अशा सुट्ट्यांच्या काळात वृक्षरोपण व संवर्धनाने सुजलाम सुफलामसाठी मन लावून काम करावे अशी निसर्गभज्ञाक चळवळीचे आवाहन आहे.राजस्थानमध्ये 49 अंश सेल्सियसच्या वर तापमान गेले. त्यातून निसर्गभज्ञाक चळवळीने ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडविण्यासाठी जोर धरला आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्यात किमान 10 झाडे लावून जगविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या आवारात उभी राहिलेल्या बागेला न्यायभक्ती उद्यान घोषित करावे अशी मागणी संघटनेने केलेली आहे. देशातील सर्व न्यायालयाच्या समोर न्यायभक्ती उद्यानांची उभारणी व्हावी असा आग्रह देखील निसर्गभज्ञाक चळवळीने ठेवला आहे. यासाठी ॲड. गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, विश्वनाथ पाटोळे ( पुणे ) शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.
Recent Posts
इंटिग्रेटेड नॉलेज थिअरी (IKT) मध्ये लोकांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता
October 23, 2024
No Comments
अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्जाच्या जाचक अटी रद्द करा व कोरोना काळातील कर्ज माफ करा
October 10, 2024
No Comments

सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांचा सत्कार
August 10, 2024
No Comments