नगर भाजपच्या वतीने आव्हाड यांचा निषेध

आवडांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

अहमदनगर -नगर भाजपच्या वतीने आव्हाडांचा निषेध करण्यात आला. महाड येथील चवदार तळ्यावर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचे दहन करून शालेय पुस्तकात मनुस्मृतीचे धडे घेऊ नका म्हणून आंदोलन केले होते. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या फोटोचा अवमान  झाला होता. आव्हाड यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. आज अहमदनगर भाजपच्या वतीने आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या मिरा सरोदे यांनी आवाडांच्या प्रतिमेला जोडे मारले यावेळी जिल्हा अध्यक्ष ऍड अभय आगरकर, भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संदीप पवार, भाजपा अनु मोर्चाचे अध्यक्ष नरेश चव्हाण, माजी महापौर बाबा साहेब वाकळे, श्री उमाप, सुनील भोसले, नगरसेवक, पदाधिकारी यांनी निषेध नोंदवला.

news portal development company in india
marketmystique