लोक भज्ञाक चळवळीचा ग्लोबल वार्मिंग विरुद्ध व्यापक लढा

जय जवान,जय किसान,जय विज्ञान,जय निसर्गपाल अशी क्रांतीकारी घोषणा

अहमदनगर- लोकभज्ञाक संघटनेने ग्लोबल वार्मिंग विरूद्ध लढा व्यापक करण्यासाठी दिली आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात भारतातील तापमान कमाल 47अंशाच्या वर गेले आहे त्यातून संपूर्ण देश खडबडून जागा झाला आहे यंदाच्या मान्सूनचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्वयंसेवी संघटना झाडे लावण्याच्या तयारीला लागले आहेत लोकभज्ञाक चळवळीने ग्लोबल वार्मिंग विरूद्ध आजिवन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना निसर्गपाल म्हणून गौरविले आहे आणि लोकभज्ञाक संघटनेने जय जवान,जय किसान,जय विज्ञान,जय निसर्गपाल ही क्रांतीकारी घोषणा दिली आहे देशात सर्वत्र निसर्गपाल कार्यकर्त्यांनी पुढे येऊन आपापल्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेला सहभागी करून घ्येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी यामगची भुमिका आहे दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान अशी घोषणा देऊन सिमेवरच्या सैनिकांना व शेतातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. पुढे दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जय विज्ञान अशाप्रकारची सुधारित घोषणा केली, लोकभज्ञाक चळवळीने त्या घोषणेमध्ये जय निसर्गपाल अशी वाढ केली आहे. त्यामुळे जय जवान,जय किसान जय विज्ञान,जय निसर्गपाल अशा स्वरुपात ही घोषणा लोकांसमोर आली आहे.यापुढे प्रत्येकाने ग्लोबल वार्मिंग विरूद्ध लढले पाहिजे अन्यथा संपुर्ण सजीवसृष्टी बेचिराख होईल. त्यामुळे आजच सर्वांनी जागे होऊन कार्यरत झाले पाहिजे असे तळमळीचे आवाहन या संघटनेने केले आहे. आपल्या घराच्या भोवती नॅनो धनराई उभी करण्यासाठी म्हणजेच आधुनिक परसबाग उभी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ज्या ठिकाणी झाडे लावणे शक्य आहे. त्या ठिकाणी सामुदायिक प्रयत्नात झाडे लावून वाचविली पाहिजे. अहमदनगर शहरात मोठ्या संख्येने वकील आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आजिवन निसर्गपाल म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आहे. या संघटनेने ग्लोबल वार्मिंग विरूद्ध व्यापक निसर्ग स्वातंत्र्य लढा जारी केला ग्लोबल वार्मिंगमुळे जैवविविधता धोक्यात आली त्यामुळे निसर्ग वाचविण्याची हिच वेळ आहे असे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पक्के ठरविले आहे. निसर्ग वाचविण्यासाठी व मोठ्या प्रमाणात शहर व खेड्यांमध्ये झाडे लावून वाचविण्यासाठी कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाडी सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीचे विजेवर चालणारे,मोटारसायकला जोडले वाॅटर टॅंकर बेरोजगार तरुणांना उपलब्ध करून देऊन अशा स्वयंरोजगार करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला सामाजिक वनपाल मान्यता देऊन योग्य मोबदल्यावर काम कराण्याची परवानगी द्यावी अशी योजना सरकारने त्वरित निर्माण करावी यासाठी लोकभज्ञाक संघटनेचा आग्रह आहे अहमदनगर महापालिकेने निसर्गपालांच्या आजिवन कार्याला साथ देण्यासाठी गुरुवार दि.30 मे रोजी आयुक्त पंकज जावळे, उपायुक्त विजयकुमार मुंडे, तसेच उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित केली आहे.
यावेळी लोकभज्ञाक संघटनेचे ॲड. कारभारी गवळी, ओम कदम, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदी सक्रिय आहेत.

news portal development company in india
marketmystique